हे शिवनंदन, करितो वंदन


| |

हे शिवनंदन, करितो वंदन
विघ्नांचे करुनी निर्दालन
सुख शांती दे अम्हा चिरंतन

गगनी भरल्या रंगांमधुनी
अन फुललेल्या कुसुमांमधुनी
तव रूपाचे होते दर्शन
हे शिवनंदन, करितो वंदन

कोसळणार्याह धारांमधुनी
सळसळणार्याह वार्याधमधुनी
तव सूरांचे होते गुंजन
हे शिवनंदन, करितो वंदन

श्वासांमधुनी तुला पूजितो
देहाचे या फूल अर्पितो
स्पंदांतुनही तुझेच कीर्तन
हे शिवनंदन, करितो वंदन
विघ्नांचे करुनी निर्दालन
सुख शांती दे अम्हा चिरंतन

एकूण गुणांकन
++++++----
गुण: 6.8, मिळालेली मते: 13
Votes
कृपया या पानाचे गुणांकन करावे. 1 - कमितकमी गुण, 10 - सर्वाधिक गुण

थन्क्स fओर

थन्क्स fओर थे wएल्ल मेअनिन्ग इन्fओर्मतिओन्.

- Vएर्य गोओद

- Vएर्य गोओद नेwस्.