गझल

तुझी नजर...


| |

असे जहालसे जहर तुझी नजर
मनात निर्मिते कहर तुझी नजर!

कितीक टाळलेस शब्द तू तरी
हळूच देतसे खबर तुझी नजर

एकूण गुणांकन
गुण: 5.9, मिळालेली मते: 64

प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले


| |

प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले
प्रत्येक माणसाच्या हृदयात वादळाचे थैमान माजलेले

बाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे
प्रत्येक सागराच्या गर्भास अमृताचे वरदान लाभलेले

एकूण गुणांकन
गुण: 7.6, मिळालेली मते: 38

'बजेट' ची गझल!


| |

तसेच ते खुळे ठराव वाचतो बजेटमधे
सदैव वाढतात भाव, पाहतो बजेटमधे

अजून राहिलेत द्यायचे जुनेच कर तरी
नवीन कर, नवीन घाव झेलतो बजेटमधे

एकूण गुणांकन
गुण: 3.1, मिळालेली मते: 203

नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी


| |

नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी
जो तुम्हाला भेटला तो देव म्हटला शेटजी!

एक वाटी शेंदराची सांडली रस्त्यावरी
अन तिथे तुमच्यामुळे बाजार भरला शेटजी...

एकूण गुणांकन
गुण: 7.9, मिळालेली मते: 21

गुंड लोकांचे...


| |

भक्त झाले लोक सगळे गुंड लोकांचे
भोवताली भव्य पुतळे गुंड लोकांचे

रोजची चतकोर पत्रे सभ्य लोकांची
अन पहा हे भव्य मथळे गुंड लोकांचे!

एकूण गुणांकन
गुण: 6.3, मिळालेली मते: 6

प्रेमाचा रिंगटोन (Video)


कुणीतरी आठवण काढतंय या कार्यक्रमामधील एक कविता...

येथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल

एकूण गुणांकन
गुण: 9.6, मिळालेली मते: 32

ऋतू येत होते, ऋतू जात होते


| |

ऋतू येत होते, ऋतू जात होते
कधी खिन्न होते, कधी गात होते!

किनारे सुखाचे कुणाला मिळाले?
कितीसे खलाशी समुद्रात होते...

एकूण गुणांकन
गुण: 5.6, मिळालेली मते: 10

भास आहे सर्वकाही...


| |

भास आहे सर्वकाही...
जीवनाला अर्थ नाही

तो म्हणे सर्वत्र आहे
(भेट नाही एकदाही...)

एकूण गुणांकन
गुण: 7.9, मिळालेली मते: 17

तुला सांगतो भगवंता...


| |

तुला सांगतो भगवंता हे असे वागणे असू नये
तुला चेहरा माझा दिसतो, मला तुझा का दिसू नये!

वस्त्र नागडे तेजाचे घे, वा दुलई अंधाराची
तेज-तमाच्या सीमेवरती जिवास उसवत बसू नये!

एकूण गुणांकन
गुण: 7.6, मिळालेली मते: 40

आपल्या दोघांमधे ही गॅप का?


| |

आपल्या दोघांमधे ही गॅप का?
ऐकतो मी लावण्या, तू रॅप का?

राहतो राणी तुझ्या हृदयात मी
शोधते आहेस गूगल-मॅप का!

एकूण गुणांकन
गुण: 7.7, मिळालेली मते: 185
Syndicate content