गझल

गझल

हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...

- गझल, उपरोधिक, सामाजिक

हळूहळू घरोघरी अमेरिका घुसेल...
गिळून हाय भाकरी, पिझाच वावरेल

बनेल जीन्स हाच राष्ट्र-वेष आपुला
गुढीस वस्त्रही नवीन जीन्सचे असेल!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.9 (59 मते)

नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी

- गझल, उपरोधिक, सामाजिक

नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी
जो तुम्हाला भेटला तो देव म्हटला शेटजी!

एक वाटी शेंदराची सांडली रस्त्यावरी
अन तिथे तुमच्यामुळे बाजार भरला शेटजी...

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8 (53 मते)

आपल्या दोघांमधे ही गॅप का?

- गझल, विनोदी, वैयक्‍तिक

आपल्या दोघांमधे ही गॅप का?
ऐकतो मी लावण्या, तू रॅप का?

राहतो राणी तुझ्या हृदयात मी
शोधते आहेस गूगल-मॅप का!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.6 (262 मते)

ती जाताना 'येते' म्हणून गेली

- गझल, रोमॅंटिक, वैयक्‍तिक

ती जाताना 'येते' म्हणून गेली
अन जगण्याचे कारण बनून गेली!

म्हटली मजला 'मनात काही नाही'
पण जाताना मागे बघून गेली!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.6 (228 मते)

याद येते...

- गझल, गंभीर, वैयक्‍तिक

तुझी ती तान आता याद येते
अदा बेभान आता याद येते

तुला पाहून होते संपले जे
हरवले भान आता याद येते

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.9 (109 मते)

शिल्पकार

- गझल, प्रेरणादायी, वैयक्‍तिक

झेलावयास माझी छाती तयार आता
घाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता

मी एकटाच गातो या उत्सवात माझ्या
माझ्याच गायकीवर माझी माझी मदार आता

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.1 (58 मते)

तुझी नजर...

- गझल, रोमॅंटिक, वैयक्‍तिक

असे जहालसे जहर तुझी नजर
मनात निर्मिते कहर तुझी नजर!

कितीक टाळलेस शब्द तू तरी
हळूच देतसे खबर तुझी नजर

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:6.4 (86 मते)

प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले

- गझल, गंभीर, वैयक्‍तिक

प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले
प्रत्येक माणसाच्या हृदयात वादळाचे थैमान माजलेले

बाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे
प्रत्येक सागराच्या गर्भास अमृताचे वरदान लाभलेले

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.6 (43 मते)

'बजेट' ची गझल!

- गझल, उपरोधिक, सामाजिक

तसेच ते खुळे ठराव वाचतो बजेटमधे
सदैव वाढतात भाव, पाहतो बजेटमधे

अजून राहिलेत द्यायचे जुनेच कर तरी
नवीन कर, नवीन घाव झेलतो बजेटमधे

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:3.3 (212 मते)

गुंड लोकांचे...

- गझल, उपरोधिक, सामाजिक

भक्त झाले लोक सगळे गुंड लोकांचे
भोवताली भव्य पुतळे गुंड लोकांचे

रोजची चतकोर पत्रे सभ्य लोकांची
अन पहा हे भव्य मथळे गुंड लोकांचे!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:6.7 (11 मते)

छायाचित्र