वैयक्‍तिक

वैयक्‍तिक

पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले

- छंदबद्ध कविता, गंभीर, वैयक्‍तिक

डोळ्यात चार थेंबांचे
आभाळ तरारुन गेले
पाऊस फिरकला नाही,
नुसतेच ढगाळून गेले

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.4 (54 मते)

आपल्या दोघांमधे ही गॅप का?

- गझल, विनोदी, वैयक्‍तिक

आपल्या दोघांमधे ही गॅप का?
ऐकतो मी लावण्या, तू रॅप का?

राहतो राणी तुझ्या हृदयात मी
शोधते आहेस गूगल-मॅप का!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.6 (263 मते)

ती जाताना 'येते' म्हणून गेली

- गझल, रोमॅंटिक, वैयक्‍तिक

ती जाताना 'येते' म्हणून गेली
अन जगण्याचे कारण बनून गेली!

म्हटली मजला 'मनात काही नाही'
पण जाताना मागे बघून गेली!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.6 (229 मते)

याद येते...

- गझल, गंभीर, वैयक्‍तिक

तुझी ती तान आता याद येते
अदा बेभान आता याद येते

तुला पाहून होते संपले जे
हरवले भान आता याद येते

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.9 (110 मते)

शिल्पकार

- गझल, प्रेरणादायी, वैयक्‍तिक

झेलावयास माझी छाती तयार आता
घाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता

मी एकटाच गातो या उत्सवात माझ्या
माझ्याच गायकीवर माझी माझी मदार आता

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.2 (59 मते)

साधं सोपं आयुष्य

- मुक्‍तछंद कविता, प्रेरणादायी, वैयक्‍तिक

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.4 (136 मते)

धडाम धुडुम धुम धुम

- छंदबद्ध कविता, प्रेरणादायी, वैयक्‍तिक

धडाम धुडुम धुम धुम
धडाम धुडुम धमु धुम

पाउस आला सर सर सर
वेचुया गारा भर भर भर
पाण्यात नाचु गर गर गर
पाणी उडे छम छम...
धडाम धुडुम धुम धुम

ढगांत झाली गड गड गड
विजेची झाली कड कड कड
मनात झाली धड धड धड
वारा वाहे सुम समु ...
धडाम धुडुम धुम धुम

धडाम धुडुम धुम धुम
धडाम धुडुम धमु धुम

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.1 (8 मते)

तुझी नजर...

- गझल, रोमॅंटिक, वैयक्‍तिक

असे जहालसे जहर तुझी नजर
मनात निर्मिते कहर तुझी नजर!

कितीक टाळलेस शब्द तू तरी
हळूच देतसे खबर तुझी नजर

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:6.4 (86 मते)

प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले

- गझल, गंभीर, वैयक्‍तिक

प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले
प्रत्येक माणसाच्या हृदयात वादळाचे थैमान माजलेले

बाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे
प्रत्येक सागराच्या गर्भास अमृताचे वरदान लाभलेले

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.6 (43 मते)

पाऊस जोराचा... आकांताचा...

- मुक्‍तछंद कविता, गंभीर, वैयक्‍तिक

वेळ रात्रीची... एकांताची
पाऊस जोराचा... आकांताचा...

खिडकीच्या काचेवर त्वेषानं आपटणारे थेंब
घरात जरी येत नसले
तरी हृदयात खोलवर शिरत रहातात
आणि
घराबाहेरचे वादळवारे आता
मनातही वेगानं फिरत रहातात

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.6 (32 मते)

छायाचित्र