विडंबन

विडंबन

मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन!

- विडंबन, उपरोधिक, राजकीय

मूळ गीत: मी पप्पांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन!
मूळ कवी: संदीप खरे
(http://www.youtube.com/watch?v=mGfBJmnw3_8)

मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन!
हॅलो, हॅलो, बोलतंय कोण
हॅलो, हॅलो, बोलतंय कोण
हॅलो, बोलतंय कोण…

सोनियाबाई मी गांधींघरची
रिमोट माझा, माझी खुर्ची
वरतुन अॉर्डर माझिच हाय
तुमचे कायबी चालणार नाय
तुम्ही कोण, काय तुमचे नाव
सांगा पटपट कुठले गाव

कसले नाव, नी कसला गाव
रॉंग नंबर लागला राव…
मी अण्णांचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन!

आमचे नाव राजा शेठ
स्पेक्ट्रम विकतो आम्ही थेट
आमची पोळी, तुमचं तूप
चापुन खातो आम्ही खूप
तुम्ही कोण, काय तुमचे नाव

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.3 (67 मते)

मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले

- विडंबन, उपरोधिक, सामाजिक

मूळ कविता : मेघ नसता वीज नसता
मूळ कवी : संदीप खरे

मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले
जाहले रस्ते नवे तेथे उकरणे चालले!

(रस्ता रोडरोलरला म्हणतो)
जाडसर चाकावरी का काळसरसा लेप हा?
तू मला ’रोलून’ बघताना तुला मी पाहिले!

एवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा?
मुंगळेही डांबरावर भार वाटू लागले

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.7 (23 मते)

दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट! (Video)

- विडंबन, विनोदी, सामाजिक

नुकत्याच झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगात सादर केलेलं हे विडंबन!

येथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.4 (57 मते)

आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो...

- विडंबन, विनोदी, कौटुंबिक

आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो
लाचारीने फिरवून कार्डे सहीस मागवतो

शर्ट नको मज कुठलाही अन पँट नको आहे
बक्कल कुठले मुळात मजला बेल्ट नको आहे
बायकोसंगे परवा माझ्या करार मी केला
सर्व खरेदी तिला करावी, काही नको मजला
बायकोजीच्या पुंगीवर मी नवरोबा डुलतो!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.4 (42 मते)

पेटवा पेटवा

- विडंबन, विनोदी, वैयक्‍तिक

चाल: केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा

पेटवा पेटवा
ह्याच्या कानाखाली पेटवा

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.9 (89 मते)

चला आता झोपू आपण...

- विडंबन, विनोदी, वैयक्‍तिक

चाल: उष:काल होता होता काळरात्र झाली

चला आता झोपू आपण फार रात्र झाली
आहे उद्या कामावरती वाह्यची हमाली

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:6.9 (34 मते)

माधुरीचा राम

- विडंबन, विनोदी, सामाजिक

चाल: कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम

माधुरीचा राम बाई
माधुरीचा राम
सगळे म्हणती हा नेने
आहे भाग्यवान बाई
आहे भाग्यवान

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.3 (26 मते)

तोच चंद्रमा विराट

- विडंबन, विनोदी, कौटुंबिक

चाल: तोच चंद्रमा नभात

तोच चंद्रमा विराट
तीच लठ्ठ कामिनी
येताना तुज बघुन
लाजती ग हत्तीणी

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.8 (28 मते)

चोरायण

- विडंबन, विनोदी, सामाजिक

चाल:
स्वये श्री रामप्रभु ऐकती
कुशलव रामायण गाती

स्वये श्री डॉन प्रभु ऐकती
मंत्रिगण चोरायण गाती

आहेत दोघे एक कुळाचे
सजीव पुतळे चोरपणाचे
चेले गाती चरित बॉसचे
मृत्यूने काळाची आरती
मंत्रिगण चोरायण गाती

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.5 (13 मते)

गंऽऽऽ भाजणी

- विडंबन, विनोदी, वैयक्‍तिक

चाल: गं साजणी, कुण्या गावाची तू गं राणी

गंऽऽऽ भाजणी
थालि पीठाची
किंवा चकलीची
आहे कशाची तू गं राणी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.9 (24 मते)

छायाचित्र