छंदबद्ध कविता, मुक्‍तछंद कविता

पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले

- छंदबद्ध कविता, गंभीर, वैयक्‍तिक

डोळ्यात चार थेंबांचे
आभाळ तरारुन गेले
पाऊस फिरकला नाही,
नुसतेच ढगाळून गेले

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.4 (53 मते)

साधं सोपं आयुष्य

- मुक्‍तछंद कविता, प्रेरणादायी, वैयक्‍तिक

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.4 (136 मते)

धडाम धुडुम धुम धुम

- छंदबद्ध कविता, प्रेरणादायी, वैयक्‍तिक

धडाम धुडुम धुम धुम
धडाम धुडुम धमु धुम

पाउस आला सर सर सर
वेचुया गारा भर भर भर
पाण्यात नाचु गर गर गर
पाणी उडे छम छम...
धडाम धुडुम धुम धुम

ढगांत झाली गड गड गड
विजेची झाली कड कड कड
मनात झाली धड धड धड
वारा वाहे सुम समु ...
धडाम धुडुम धुम धुम

धडाम धुडुम धुम धुम
धडाम धुडुम धमु धुम

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.1 (8 मते)

हे शिवनंदन, करितो वंदन

- छंदबद्ध कविता, प्रेरणादायी, अध्यात्मिक

हे शिवनंदन, करितो वंदन
विघ्नांचे करुनी निर्दालन
सुख शांती दे अम्हा चिरंतन

गगनी भरल्या रंगांमधुनी
अन फुललेल्या कुसुमांमधुनी
तव रूपाचे होते दर्शन
हे शिवनंदन, करितो वंदन

कोसळणार्याह धारांमधुनी
सळसळणार्याह वार्याधमधुनी

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.7 (27 मते)

गणपतीचे बडबड गीत

- छंदबद्ध कविता, विनोदी, अध्यात्मिक

(चाल: आओ बच्चो तुम्हे दिखाये झांकी हिंदुस्तानकी!)

गणपती बाप्पा माझ्यासाठी
एवढं तरी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

मनिमाउचे मौ मौ शेपुट
चिवचिवणे चिउताईचे
माकडदादाचे ते हुपहुप
गुरगुरणे वाघोबाचे
मला सांग तू या मित्रांशी
दोस्ती माझी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.3 (96 मते)

पाऊस जोराचा... आकांताचा...

- मुक्‍तछंद कविता, गंभीर, वैयक्‍तिक

वेळ रात्रीची... एकांताची
पाऊस जोराचा... आकांताचा...

खिडकीच्या काचेवर त्वेषानं आपटणारे थेंब
घरात जरी येत नसले
तरी हृदयात खोलवर शिरत रहातात
आणि
घराबाहेरचे वादळवारे आता
मनातही वेगानं फिरत रहातात

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.6 (32 मते)

बापुजींची ईमेल...

- मुक्‍तछंद कविता, उपरोधिक, सामाजिक

पंधरा ऑगस्टला ईमेल्स बघण्याची
कुठून कळेना बुध्दी झाली...
माझ्या इनबॉक्स मधे आज
बापुजींची ईमेल आली!

sender चं नाव ओळखीचं नव्हतं
वाटलं, कदाचित spam असेल...
नंतर वाटलं, बापुजींच्या नावानी
कशाला कोण spamming करेल!

बापुजींनी लिहिलं होतं...

बेटा, साठ वर्षातली तुमची प्रगती पाहून

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.9 (54 मते)

सोबत असले... नसले कोणी...

- मुक्‍तछंद कविता, उपरोधिक, सामाजिक

मैफलीत या बसले कोणी
हसले कोणी, रुसले कोणी...

म्हणे भेटण्या झुंबड झाली
मला कसे ना दिसले कोणी?

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:6.8 (36 मते)

तिचे नि माझे नाते अभंग होते!

- मुक्‍तछंद कविता, उपरोधिक, वैयक्‍तिक

भांडण तंटे हे तर तरंग होते
तिचे नि माझे नाते अभंग होते!

एक दुज्यांची काटछाट करताना
शब्दशाप हे हळवे पतंग होते

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.8 (36 मते)

हे गजवदना

- छंदबद्ध कविता, प्रेरणादायी, अध्यात्मिक

हे गजवदना, हे गजवदना
शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना

तू करुणेचा विशाल सागर
तू तेजाने भरले अंबर
तुच अग्नि, तू वायु, धरा अन
चराचरांतून तुझी चेतना

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:4.4 (44 मते)

छायाचित्र