हास्यकविता

हास्यकविता

प्रेमाचा रिंगटोन (Video)

- हास्यकविता, रोमॅंटिक, वैयक्‍तिक

कुणीतरी आठवण काढतंय या कार्यक्रमामधील एक कविता...

येथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल

'कुणीतरी आठवण काढतंय' या कार्यक्रमाची माहिती आपल्याला येथे मिळू शकेल

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:9 (60 मते)

सुंदर तरुणी दिसल्यावर...

- हास्यकविता, रोमॅंटिक, कौटुंबिक

सुंदर तरुणी दिसल्यावर...

कळे न मजला इतके भीषण काय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही
तशी बायको सोबत माझी होती तरिही
नकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन
तिला केशरी बासुंदीची साय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8 (288 मते)

सगळेच प्राणी लग्न करतात...

- हास्यकविता, विनोदी, कौटुंबिक

माकडं असोत वा गाढवं असोत
सगळेच प्राणी लग्न करतात
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.4 (297 मते)

कणा (अतिरेक्याचा)

- हास्यकविता, उपरोधिक, राजकीय

ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:9 (332 मते)

प्रेमाचा रिंगटोन!

- हास्यकविता, विनोदी, वैयक्‍तिक

माझ्या आठवणींनी तुझं हृदय
व्हायब्रेट होत राहू दे
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

दूर सखे माझ्यापासून
गेलीस तरी चालेल
बरेच दिवस मला तू
भेटली नाहीस तरी चालेल
पण जाशील तिथे माझ्या आठवणींचं
नेटवर्क कव्हरेज असू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.6 (136 मते)

सगळ्या प्रेमकथांची अखेर...

- हास्यकविता, विनोदी, कौटुंबिक

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
गोड बोलण्यानंच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानंच होते!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8 (67 मते)

सेना... ब्रिगेड...

- हास्यकविता, विनोदी, राजकीय

चला उठा बंधुंनो आपण
घटना* आता गाढुन टाकू
आप-आपली सेना अथवा
ब्रिगेड आता आपण स्थापू

'घटने'ची ही मुजोर चौकट
तुम्हा अम्हाला हवी कशाला
जसे मानतो तसेच वागू
बघू रोखतो कोण आम्हाला
खुळे कायदे, भली व्यवस्था
मिळून आता मोडुन टाकू
आप-आपली सेना अथवा
ब्रिगेड आता आपण स्थापू

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:7.8 (25 मते)

आमच्या भूभू ची पोस्टर्स!

- हास्यकविता, विनोदी, राजकीय

परवाच आमच्या भूभूला
काही राजकारणी लोक चावून गेले
अन त्याच्या वाढदिवसाची पोस्टर्स
चौका-चौकात लावून गेले!

'धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं'
म्हणून भूभूला आम्ही धरत नाही
अन दिवसभर भुंकणं सोडून
भूभू दुसरं काही करत नाही!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.1 (118 मते)

झब्बू...

- हास्यकविता, विनोदी, वैयक्‍तिक

सदैव माझा पाठलाग का करीत असतो झब्बू
खेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू!

फुले घेऊनी जातो जेंव्हा कुठल्या राणीसाठी
राणी तेंव्हा थांबुन असते भलत्या राजासाठी!
'लग्न-पत्रिका' घेऊन येते, देऊन जाते झब्बू
खेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:9 (134 मते)

ज्या ज्या वयात जे जे करायचं

- हास्यकविता, विनोदी, वैयक्‍तिक

ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं!

लहानपणी... फुलपाखरांच्या मागे धावायचं
तरुण वयात 'पाखरां'च्या मागे धावायचं
प्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं
म्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं!

तुमचे मत: अद्याप नाही गुणांकन:8.7 (130 मते)

छायाचित्र