माझ्या विषयी थोडंसं...

खरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही! तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो!

  • माझं जन्मगांव पुणे... नोकरी / व्यवसायाच्या निमित्त युरोप, अमेरिका व इंग्लंड मध्ये प्रवास व वास्तव्य... सध्या वास्तव्य पुण्यामध्ये..
  • मी शिक्षणाने Cost Accountant (ICWA), पण गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये Techno-Functional व व्यवस्थापकीय कामं बघतो.
  • काव्य, कथा आणि ललित लेखनामध्ये विशेष रूची... गेली अनेक वर्षे मायबोली.कॉम व मनोगत.कॉम वर नियमित लिखाण...
  • 'आनंदाचं गांव' हा स्वनिर्मित कविता, गझलांचा कार्यक्रम... ज्याचे 2002 पासून पुणे व लंडन येथे अनेक प्रयोग संपन्न...
  • लंडन मधे रहात असताना तेथील महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीमधे सक्रीय सहभाग... एक वर्ष उपाध्यक्ष आणि एक वर्ष अध्यक्ष पदाची जबाबदारी...
  • लंडनमधून प्रकाशित होणार्‍या 'राणीच्या राज्यात' या मराठी ई-नियतकालिकाचा संस्थापक - संपादक...
  • www.marathigazal.com या मराठी गझलेला वाहिलेल्या संकेतथळाचा निर्माता व वैभव जोशी यांच्या समावेत त्याचा सह-व्यवस्थापक
  • मराठीमध्ये अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्याच्या हेतूने २००८ साली मराठी वेबसाईट्स डॉट कॉम या व्यवसायाची सुरुवात

बस... या पलिकडे जे सांगावंसं वाटतं ते सगळं माझ्या लिखाणात आहेच!

हे सर्व वाचल्यावर माझ्याशी संपर्क साधायची इच्छा राहिलीच असेल तर येथून साधू शकाल

- प्रसाद शिरगांवकर