अक्षरांना आस गीतांची

प्रसाद शिरगांवकर

अक्षरांना आस गीतांची
पावलांना ओढ पंखांची!

पाणपोया निर्मितो आम्ही
रीघ दारी तान्हलेल्यांची

जन्मतः मी पोळलो गेलो
प्यास होती सूर्यबिंबांची

बदलती आकार साऱ्यांचे
हाय, ही वस्ती अमीबांची!

चूल कोठे पेटली आहे
का बढाई पोलपाटांची!

विश्व सारे जिंकुनी येता
स्वागताला रास प्रेतांची...

ताज हे नाहीच ही आहे
प्रेमगाथा भग्न वेड्यांची...

भोवताली आरसे सारे
जाहली गर्दी प्रतीमांची...

गाठली आहे अखेरी मी
पंढरी माझ्याच स्पंदांची...

Average: 2.5 (53 votes)