दु:ख माझे सांगू किती

प्रसाद शिरगांवकर

दु:ख माझे सांगू किती
शब्दं पुरतच नाही
सुख कळविणण्यासाठी
शब्दं उरतच नाही!

दु:ख नेते खोल खोल
नाळ जगाशी जोडते
सुख आभाळात नेते
नातं जगाशी तोडते...

असे वाटत रहाते
दु:ख दुसऱ्याने दिले
सुख भासे मालकीचे,
'माझे मीच कमावले'

दु:ख जाणवून देते
जीव कस्पटासमान
सुख जोपासे अहंता
उडे आभाळी विमान!

सुख-दुख: येते जाते
जशी भरती-अोहोटी
स्थिर रहावे किनारी
जगण्याची ही कसोटी!

No votes yet