एकटा मी चालतो

प्रसाद शिरगांवकर

थांबले केंव्हाच सारे, एकटा मी चालतो
सोबतीला फक्त तारे, एकटा मी चालतो

धाव घेण्यालायकीची एकही नाही दिशा
भोवताली खिन्न वारे, एकटा मी चालतो

संपला उन्माद माझा, संपले तास्र्ण्यही
कोण हे आता पुकारे? एकटा मी चालतो

या तुझ्या गाण्यास राजा मी अता कंटाळलो
गायचे ते तूच गा रे... एकटा मी चालतो

नेहमी होताच ना रे मार्ग माझा वेगळा
तू तुझ्या वाटेस जा रे... एकटा मी चालतो

Average: 9.2 (32 votes)