प्रसाद शिरगांवकर

तुझ्या नि माझ्या घर्मकणांनी बनलेले घरकुल
तुझ्या नि माझ्या प्रेमफुलांनी सजलेले घरकुल

चहुदिशांना तांडव भरल्या लाटा असताना
तुझी नि माझी ओढ बघोनी तरलेले घरकुल

जरी सभोती केवळ होती रणरणती उन्हे
आपण दोघे पाहत होतो, नसलेले घरकुल

या वाटांना त्या वाटांशी जोडत असताना
दोन जिवांना गुंफत होते गढलेले घरकुल

आयुष्याशी लढता लढत थकलो जेंव्हाही
धावत गेलो सावरावया थकलेले घरकुल

Average: 6.5 (2 votes)