सार आपल्या संसाराचे...

प्रसाद शिरगांवकर

दूर राहता हे जाणवते
झगड्यामध्ये घालवतो मी
सहवासाचे कितीतरी क्षण

हेही खरे की
दोष तुझाही तितका असतो
जितका माझा

इथेच आहे गंमत सारी
असता जवळी, पाहत असतो
एकदुज्यांचे दोषच आपण

आणिक विरही करतो आपण
एकदुज्यांच्या गुणगीतांचे
अखंड गुंजन

अशी कशी ही प्रीती राणी?
असे कसे हे
सार आपल्या संसाराचे...

Average: 7.9 (14 votes)