प्रसाद शिरगांवकर

चांद होता, रात होती, रातराणी सोबती
आसमंती प्रीत होती, धुंद गाणी सोबती

सूर होता, नूर होता, पूर होता जीवनी
हाय आता आठवांच्या रिक्त खाणी सोबती

भोवताली यार होते, पाकिटे असुनी रिती
आज कोणी दोस्त नाही, खिन्न नाणी सोबती

काय झाली दुर्दशा ही, कोणती भाषा मुखी
ना उरी ज्ञानेश्वरी ना संतवाणी सोबती

कोणत्याही पावसाचा ना भरोसा आजही
पापण्यांतुन वाहणारे फक्त पाणी सोबती

Average: 8.9 (17 votes)