उडून आली माशी

प्रसाद शिरगांवकर

चाल : घर आजा परदेसी तेरा देस बुलाये रे

कुठून आली कळले नाही
कुठे निघाली कळले नाही
काहीच कळण्या आधी माशी उडून गेली रे
उडून आली माशी आणि उडून गेली रे

माशी आहे भलती हट्टी
आहे ती माझ्याशी कट्टी
बोलत नाही ती माझ्याशी
जरी बोलते ती सगळ्यांशी
काय करावे समजत नाही
काहीच माझे ऐकत नाही
भांडून कचकच माझ्याशी
ती चिडून गेली रे
उडून आली माशी आणि उडून गेली रे

तिला म्हणालो माझे माशी
येउ नको माझ्या पानाशी
तरी ती नाचत नाचत आली
इकडे तिकडे हुंगत आली
केला राडा हसता हसता
अन मी पाहत बसलो नुसता
आमटीत माझ्या पडून माशी पोहून गेली रे
उडून आली माशी आणि उडून गेली रे

Average: 5.3 (3 votes)