वादळाचे गीत आता

प्रसाद शिरगांवकर

वादळाचे गीत आता आणुया ओठांवरी
पावसाचे थेंब थोडे झेलुया अंगावरी

पान नाचे, फूल नाचे, नाचती साऱ्या दिशा
आसमंती मेघ वाजे, वीज नाचे अंबरी

का उगा शाकारसी ही मोडलेली छप्परे
या फुकाच्या बंधनांना जाऊदे वाऱ्यावरी

आसमंती गर्जणारे सूर हो तू मोकळे
गात जा तू, गात जा तू, गात जा मेघांपरी

आपल्यासाठीच जाते मृत्तिका गंधाळुनी
दाटलेला गंध ओला साठवुया अंतरी

झेलण्या पर्जन्यधारा धाव रे तू राजसा
पावसाचा स्पर्श आहे जीवनाची पंढरी...

Average: 7.3 (3 votes)