Cryptocurrency

गूढचलनांचं भविष्य काय?

व्यवहार हा मानवी जीवनाचा स्थायिभाव आहे. दहा हजार वर्षांपूर्वी शेतीमध्ये आलेला माणूस, “माझ्या शेतातली थोडी ज्वारी तुला घे आणि बदल्यात तुझ्याकडचा थोडा तांदूळ मला दे” म्हणून व्यवहार करायला लागला. एकमेकांवर आणि व्यवहारांवर अवलंबून असलेलं आयुष्य जगायला लागला. मग कधीतरी वस्तूविनिमय करण्याऐवजी कोण्या राजानं छापलेली सोन्या-चांदीची नाणी व्यवहारासाठी वापरायला लागला. अन मग पुढे सोन्या-चांदीच्या नाण्यांऐवजी सरकारी सहीचे कागदाचे तुकडेही वापरायला लागला, वापरतो आहे अजूनही. अगदी अलिकडच्या डिजिटल युगात, कागदाच्या तुकड्यांऐवजी व्हर्चुअल पैसाही आला.

Average: 8 (1 vote)

बिटकॉईन्स: सट्टेबाजी आणि फसवणुक

बिटकॉईन्सना सुरुवात झाली तेंव्हा त्यांचं मूल्य, अर्थातच, शून्य डॉलर होतं. जस जसं नेटवर्क वाढत गेलं, लोक बिटकॉईन्स तयार करायला लागले, ते वापरून व्यवहार करायला लागले तसं त्यांत ‘मूल्य’ तयार व्हायला लागलं. २०११ मध्ये एका बिटकॉईनचं मूल्य साधारण ३० सेंट्स (0.3 एवढं होतं). ते वर्षाभरात २ डॉलर्सपर्यंत वाढलं. पुढच्या वर्षात वाढत वाढत जाऊन ते २६६ डॉलर्स झालं आणि त्याच वर्षात कोसळून पुन्हा ५० डॉलर्सवर गेलं. पुढच्या दोन तीन वर्षां अफाट चढउतार होत राहिले. अगदी बाराशे-चौदाशे डॉलर्सपर्यंत मूल्य जायचं आणि कोसळून पाच-सहाशेवर खाली यायचं.

Average: 8 (1 vote)

बिटकॉईन्स कायदेशीर आहेत का बेकायदेशीर?

बिटकॉईन्स आणि एकूणच सर्व गूढचलनं यांच्या नियंत्रणासाठी भारत, अमेरिकेसह जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये कायदेच नाहीत. किंबहुना, जगातल्या कोणत्याही देशाच्या नियंत्रणामध्ये न रहाता जगातल्या ज्याला वापरावंसं वाटतंय त्या कोणाच्याही मालकीचं 'मुक्त' चलन असावं या हेतूनचं गूढचलनांची निर्मिती झाली होती.

बिटकॉईन्सचं मायनिंग करणं, ती जवळ बाळगणं, ती वापरून व्यवहार करणं हे काहीही म्हणजे काहीही, जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये बेकायदेशीर नाही, भारतातही नाही.

Average: 8 (1 vote)

गूढचलनाचा इतिहास आणि सद्यस्थिती

गूढचलनं अस्तित्वात कशी आली आणि झपाट्यानं जगभर पसरली कशी याचा इतिहास फारच रोचक आहे. १९९८ साली निक झाबो नावाच्या एका संगणक शास्त्रज्ञानं ‘विकेंद्रित डिजिटल चलनाची’ संकल्पना मांडली. त्यानं ‘बिट गोल्ड’ नावाच्या एक प्रणालीची संकल्पना मांडली. क्लिष्ट गणिती कोडी सोडवण्याच्या बदल्यात लोकांना व्हर्चुअल पैसे देणं आणि मग ते पैसे वापरून झालेले व्यवहार नोंदवून चलनव्यवस्था उभी करणं अशी त्याची कल्पना होती. ती तेंव्हा ह्या मॉडेलमधल्या काही अडचणींमुळे प्रत्यक्षात आली नाही.

Average: 8 (1 vote)

गूढचलनातल्या व्यवहारांची नोंद कशी होते?

आपण चेकने किंवा डेबिट कार्डाने व्यवहार करतो तेंव्हा तो ‘बॅंक’ या व्यवहार करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना मान्य असलेल्या मध्यवर्ती संस्थेद्वारे करतो. चेक देणाऱ्याच्या अकाउंटचं बँकेमध्ये रेकॉर्ड असतं. त्यात पैसे आहेत का हे तपासून चेक त्यातून पैसे वजा करून चेक घेणाऱ्या माणसाच्या अकाउंटला जमा करण्याचं काम बँक करते. दोन्ही खाती एकाच बँकेत आहेत असं गृहित धरलं, तर या दोन व्यक्तींमधल्या व्यवहाराची नोंद एकाच बँकेच्या लेजर मध्ये होते.

Average: 8 (1 vote)

गूढचलन: तयार कसं होतं, मिळवायचं कसं?

प्रत्येक देशाचं सरकार आपापल्या देशाच्या चलनी नोटा छापतं. ते ते चलन त्या त्या देशात लीगल टेंडर असतं आणि साधे कागदी तुकडे असूनही ते देशातल्या सर्व व्यवहारांसाठी ते वापरले जातात.

बिटकॉईन्स हे मात्र कोणी एक सरकार, कंपनी, संस्था किंवा व्यक्ती तयार करत नाही. ते चलन कोणाच्याच मालकीचं नाही. कोणा एकाचं त्यावर नियंत्रण नाही. ते चलन वापरणाऱ्या सर्व 'नेटवर्क'च्या मालकीचं आहे.

बिटकॉईन हे मुक्तस्रोत (ओपन सोर्स) सॉफ्टवेअर मधून तयार होणारं आणि वापरता येऊ शकणारं चलन आहे. बिटकॉईन संबंधित सॉफ्टवेअर्स वापरून 'नेटवर्क'साठी ठराविक काम करणाऱ्या लोकांना नवी बिटकॉईन्स मिळतात.

Average: 8 (1 vote)

बिटकॉईन नावाचं 'गूढचलन'

बिटकॉईन नावाचं नवं ‘गूढचलन’ सध्या जगभरात गाजत आहे. त्यासारखी इतर अनेक गूढचलनं (cryptocurrencies) जगात आली आहेत. ही नेमकी काय भानगड आहे याचा वेध घेण्याचा प्रयत्न.  
Average: 7.8 (5 votes)