परदेशातून देशामध्ये

प्रसाद शिरगांवकर

परदेशातून देशामध्ये वारा बनून आलो
क्षितीजावरती चमचमणारा तारा बनून आलो

दाटून आलो डोक्यावरती बनून काळे मेघ
कोसळणार्‍या थेंबांमधल्या गारा बनून आलो

खंबीर आहे धातू जैसा तरी प्रवाही आहे
हातामधला थरथरणारा पारा बनून आलो

गावामधल्या क्षितीजावरती धुमकेतू माझा अन
नभी पेटल्या उल्कांचा मी मारा बनून आलो

सोडून गेलो होतो तुजला कधी कुण्या दुष्काळी
गालांवरती ओघळणार्‍या धारा बनून आलो

Average: 7.8 (4 votes)